डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी रक्तदान शिबिर
रक्तदान शिबिरातून भीम अनुयायांनी वाहिली आदरांजली
राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी म्हणजेच 6 डिसेंबर 2023 रोजी लॉर्ड बुद्ध ऑफिस, संविधान चौक, यवतमाळ येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, व त्या माध्यमातुन 139 रक्तदात्यांनी रक्तदान करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले व आदरांजली वाहिली. या माध्यमातून गरजूवंत रुग्णांपर्यंत शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातून सदर रक्त मोफत पोचवण्यात येईल.
सदर रक्तदान शिबिराला यवतमाळची स्वर कन्या गीत प्रशांत बागडे (झी. टीव्ही सारेगामप मराठी ची रनरअप) याची प्रमुख उपस्थिती होती व तिने बाबासाहेबांवर एक आदरांजली पर गीत गाऊन रक्तदात्यांना प्रोत्साहित केले.