अन्यथा नक्षलवादी बनायची परवानगी द्या.शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे.

नागपूर हिवाळी अधिवेशनात सर्वांसाठी शेतीचे धोरण घोषित करून शेतीची अतिक्रमणे नियामानुकुल करण्याचा शासन निर्णय निर्गमित करा.अन्यथा नक्षलवादी बनायची परवानगी द्या. असे निवेदन यवतमाळ जिल्हा अधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या नेतृत्वाखाली केली आहे.

निवेदनात नमूद केले आहे की तत्कालीन सरकारने सर्वांसाठी घरे धोरणाची अंमलबजावणी करण्याकरिता निवासी अतिक्रमणे नियामानुकुळ करण्याचा शासन निर्णय निर्गमित केला त्याच धर्तीवर विद्यमान सरकारने सर्वांसाठी शेती चे धोरण घोषित करून शेतीची अतिक्रमणे नियामानुकुल करण्याचा शासन निर्णय निर्गमित करावा अन्यथा नक्षलवादी बनायची परवानगी देण्यात यावी अशी मागणी भाई जगदीश कुमार इंगळे यांनी मुखयमंत्र्यांकडे केली असून हिवाळी अधिवेशनाच्या कार्यकाळात पूर्ण करण्यासाठी 15 डिसेंबर पासून यशवंत स्टेडियम नागपूर येथे बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन आयोजित केले असल्याची माहिती संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. यावेळी यवतमाळ जिल्हा अध्यक्ष विलास पवार तालुका अध्यक्ष राजेंद्र नाईकवाडे महिला अध्यक्षा सौ इंदिरा बोंधारे, सुधाकर सोनटक्के, विजय भुजडे, रेणुका पवार, हिराबाई पावर, विठ्ठल बोबडे, उकांडा आडे सहित बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed