खासदार संजय राऊत यांच्यावर उमरखेड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल आक्षेपार्ह व बदनामीकारक लिखाण शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मुखपत्र असलेला सामना वृत्तपत्रात लिखाण केल्याबद्दल भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी उमरखेड पोलीस स्टेशनमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार तथा सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यावर उमरखेड पोलिसांनी तात्काळ दखल घेत खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध असलेल्या तक्रारीवरून उमरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी आपल्या तक्रारीत संजय राऊत हे नेहमीच समाजात धर्मात ते निर्माण होईल देश विरोधी लिखाण करून देशातील एकतेला धोका निर्माण होईल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व देशाची बदनामी होईल असे लिखाण करतात अशी तक्रार देण्यात आली आहे. भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांच्या तक्रारीवरून उमरखेड पोलिसांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.