यवतमाळ तालुक्यातील शिक्षकांना मिळाले बालसंरक्षणाचे धडे
तालुक्यातील वडगाव रोड व कापरा केंद्रातील शिक्षकांचा समावेश
बालसंरक्षक प्रशिक्षणात जिल्हा बालसंरक्षक समन्वयक मधुमती सांगळे यांची उपस्थिती…
यवतमाळ-
यवतमाळ पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद वडगाव रोड येथे दि. 22 मार्च ते 23 मार्च पर्यंत बालसंरक्षक प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करणत आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वडगाव रोड केंद्राचे केंद्र प्रमुख सुदर्शन थोटे यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून जिल्हा नोडल अधिकारी मधुमती सांगळे तसेच साधनव्यक्ती शुभांगी वानखडे यांची उपस्थिती होती. तर तज्ञ मार्गदर्शक म्हणून मिलींद देशपांडे, अभय बोरीकर यांनी काम पाहिले.
आजही बालक कुटूंबासह समाजात सुरक्षित नाही त्यांचे समाजात होणारे भावनिक, सामाजिक, मानसिक, शारीरिक शोषण होत आहे. बालकावरील होणारे अत्याचार रोखण्यासाठी यवतमाळ तालुक्यातील शिक्षकांना बालसंरक्षणाचे धडे दिले. आता बालसंरक्षक म्हणून शिक्षक कार्य करणार असून शिक्षकांसह सामाजिक व गावपातळीवरील महत्वाच्या व्यक्तीवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. “पोक्सो” कायद्याची माहिती वडगाव रोड कापरा केंद्रातील शिक्षकांना देण्यात आली. बालक हा सर्वांगीण दृष्ट्या सुरक्षित राहावा यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.. या प्रसंगी जिल्हासमन्वयक तथा नोडल अधिकारी, मधुमती सांगळे, केंद्रप्रमुख सुदर्शन थोटे, साधन व्यक्ती शुभांगी वानखडे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले तर मिलींद देशपांडे, अभय बोरीकर यांनी आपल्या महत्वपूर्ण अध्यापनातुन उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी गजानन पवार, राजहंस मेंढे, रामकृष्ण चंदनखेडे, शेख जावेद, अनिल जयस्वाल, सतिश निलावार, चंदा पाकधने, भारती जिरापुरे, स्नेहल फुंडे, प्रभाकर खोडे, राठोड, विजय भगत आदिंची उपस्थिती होती. असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजहंस मेंढे यांनी कळविले आहे.