एमएच-२९ हेल्पिंग हँडस टीमच्या वतीने जनजागृती

झाडांची पूजा करून होळी साजरी “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे”
“झाडे लावा झाडे जगवा” असे संदेश आपण नेहमीच अनेक ठिकाणी वाचले आहे. त्यामुळे निसर्गाचे महत्त्व प्रत्येकालाच चांगले माहीत आहे. कोरोना काळात ऑक्सिजनच्या तुटवड्याने अनेकांचे प्राण गेले. त्यामुळे ऑक्सिजन देणारे वृक्ष आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे झाडांची
कत्तल न करता, पूजा करून होळी साजरी करण्यात यावी, यासाठी एमएच-२९ हेल्पिंग हॅन्डच्यावतीने उपक्रम राबविण्यात आला.
होळीचे औचित्य साधून एम एच-२९ हेल्पिंग हँडस टीमच्यावतीने स्थानिक :वन उद्यान येथे झाडांची पूजा करून सामाजिक संदेश देण्यात आला त्यासोबतच जनतेला एक निसर्गमय होळी कशी साजरी करता
येईल,या उद्देशाने जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी एमएच-२९ हेल्पिंग हँड टीम संस्थापक.अध्यक्ष नीलेश मेश्राम,उपाध्यक्ष प्रज्वल तुरकाने,युवा प्रमुख शुभम तेलगोटे. अजित गजभिये.पलक चुनकर. टीना मेश्राम. त्रिशूला चपरिया. धनश्री गोरे. प्रगती चुनकर. वैष्णवी मडावी.अभि बोरकर. पवन आंबटकर. रोहित बोरकर. पंकज हेमणे. सत्यम डोंगरे. गट्टू भगत. सुभाष बोरकर.भीमा शिरबंदी