भाजपनं राज्यात मातंग समाजाचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात द्यावा.
भाजपनं राज्यात मातंग समाजाचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात द्यावा.
लहुजी शक्तीची पत्रकार परिषदेत मागणी
यवतमाळ – नुकतीच भारतीय जनता पक्षांना विधानसभा निवडणुकीची पहिली पहिली यादी जाहीर केली, मात्र या यादीत मातंग समाजाचा उमेदवार दिल्या नसल्याने लहुजी शक्ती सेनेची नाराजी असल्याचं लहुजी शक्ती सेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. अशातच भारतीय जनता पक्षांना दुसऱ्या यादीत मातंग समाजाचा उमेदवार विधानसभेच्या रिंगणात द्यावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली.
जिल्ह्यात व राज्यात राखीव मतदार संघ आहे अशातच मातंग समाजाचे मतदाते अनेक मतदारसंघात असून अनेक पक्ष हे मातंग समाजातील उमेदवारांना डावलत असून नुकतीच भारतीय जनता पक्षाने पहिली यादी जाहीर केली या यादीत राज्यात तसेच जिल्ह्यात मातंग समाजाचा एकही उमेदवार दिला नाही अशातच भारतीय भारतीय जनता पक्षाने दुसरी यादी जाहीर करण्यापूर्वी मातंग समाजाचा विचार करावा तसेच जिल्ह्यात किंवा राज्यात मातंग समाजाचा उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात द्यावा अशी मागणी यवतमाळ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत लहुजी शक्ती सेनेच्या वतीने करण्यात आली आहे