लाचखोर पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
तहसील कार्यालयातील लाचखोर पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात तहसील कार्यालयातील घटना.
वणी तहसील कार्यालयात पुरवठा निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या कार्यालयात ७० हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास करण्यात झालेल्या या कारवाईत पुरवठा अधिकारी संतोष उईके याला ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुरवठा निरीक्षक संतोष उईके यांनी रेशन दुकानदाराकडे 70 हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत संबंधित दुकानदाराने अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची तांत्रिक कारणावरून चौकशी केल्यानंतर एसीबीचे पोलिस निरीक्षक योगेश दंडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी वणी तहसील कार्यालय परिसरात सापळा रचून रेशन दुकानदाराकडून पैसे घेताना पुरवठा निरीक्षकाला ताब्यात घेतले.