२४२ कोटींचे अपहार प्रकरणातील आणखी दोन कर्ज बुडव्यांना अटक.
बँकेतील २४२ कोटींचे अपहार प्रकरणं आणखी दोन कर्ज बुडव्यांना अटक.
यवतमाळ – २४२ कोटींच्या अपहार प्रकरणातील आठ आरोपींच्या अटकेनंतर आणखी दोन आरोपीला एसआयटीच्या पथकाने अटक केली आहे. चौकशीकरिता शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून आज पुन्हा आरोपींना पोलिसांकडून न्यायालयात हजर केले जाणार आहे.
आशिष गेडाम (४४) रा. दर्डा नगर व राजू मस्की (४५) रा. मारेगाव असे अटकेतील आरोपींची नावे आहे. बाबाजी दाते महिला सहकारी बँक अपहरात २०६ जणांवर आरोप ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी आजतागायत आठ आरोपींना अटक केली. यादरम्यान त्यांची पोलीस कोठडी दरम्यान सखोल चौकशी करण्यात आली. विशेष तपास पथकाने गेल्या तीन दिवसांपासून अटक मोहीम सुरू केली आहे.
२४२ कोटींच्या अपहार प्रकरणातील दोन आरोपींना यवतमाळसह मारेगावातून अटक केली आहे. सखोल चौकशी करण्यासाठी पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले होते. दरम्यान न्यायालयाने आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आज पोलीस कोठडी संपत असल्याने त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. आतापर्यंत पोलिसांनी दहा आरोपींना अटक केली आहे. तर दुसरीकडे एसआयटीच्या धाडसत्रामुळे कचाट्यात आरोपींच्या असलेल्या कर्जदारांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे.