पंतप्रधान आवास योजना श्रीमंतांसाठीच आहे काय ? गुरुदेव युवा संघाचा शासनाला सवाल

पंतप्रधान आवास योजना श्रीमंतांसाठीच आहे काय ?
गुरुदेव युवा संघाचा शासनाला सवाल
यवतमाळ (प्रति):- यवतमाळ शहरात अद्यापपावेतो एकही लाभार्थ्याला पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नसून मंजूर झालेले घरकुल स्वतःची जागा असलेल्या नागरिकांची आहेत. त्यामुळे नाजुलच्या जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या गोरगरीब नागरिकानावर अन्याय होत आहे. शासनाची घरकुल योजना फक्त श्रीमंतांसासाठीच आहे काय असा सवाल गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी शासनाला विचारला आहे.
शासनाने मोठा गाजावाजा करून पंतप्रधान आवास योजना काढली. सर्वाना घरकुल देण्याच्या योजनेचा मात्र यवतमाळ शहरात बट्ट्याबोळ झाला आहे.
२००४ पासून ८१ रमाई आवास योजसेसाठी पाटी पुरा , दलित सोसायटी, या परिसरातील नवबौध्द घटकांतीळ लाभार्थी याना पंतप्रधान आवास योजनेत समाविष्ट करण्याचे सांगण्यात आले होते. मात्र त्यांना अद्याप त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले नाही.
. स्वतःची खरेदीची जागा असण्यार्यांना लाभ देण्यात येत असून मोडक्या पडक्या घरात जीवन जगणाऱ्या दलित बांधवाना रमाई आवास योजनेअंतर्गत लाभ देण्यास टाळाटाळ केल्या जात आहे
४३४ लोकांची पंतप्रधान आवास योजनेचेची यादी तयार झाली असून. अतिक्रमण करून राहणाऱ्या गोरगरीब बांधवाना लाभ मिळण्यास अजून दोन तीन वर्षे लागणार असल्याचे पंतप्रधान आवास योजनेचे अधिकारी यांनी गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष गेडाम याना सांगितले.
पंतप्रधान आवास योजना गोरगरिबांसाठी आहे कि श्रीमंतांसाठी असा प्रश्नही गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी उपस्थित केला आहे.
रमाई आवास योजनेत मोठा घोळ सुरु असून समाजकल्याण विभाग व नगर परिषदेला चौकशी अहवाल मागितला असता अहवाल दोन्ही विभागाकडून कुठलीच कार्यवाही करण्यात अली नाही. तलाव फैल येथील अतीक्रमीत नागरिकांना उपोषण सोडविण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ देण्याचे खोटे आश्वासन देण्यात आले. थंडीच्या दिवसात पडक्या घरात राहणाऱ्या गोरगरीब नागरिकांना निवाऱ्यासाठी नगर परिषदेचे चकरा माराव्या लागत आहे.
शहरातील अतिक्रमणधारक व पात्र नागरिक घरकुलापासून वंचित असून स्वतःची जागा असणाऱ्या श्रीमंत नागरिकांना लाभ देण्याचा प्रकार नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून होत असून गोरगरीब नागरिकांवर अन्याय होत आहे.
२०१६ मध्ये जेवढ्या गोरगरीब लाभार्थ्यांनी घरकुलासाठी अर्ज दाखल केले होते. त्या सर्व लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा. अन्यथा गुरुदेव युवा संघाच्या वतीने हिवाळी अधिवेशनावर सर्व गोरगरीब लाभार्थ्यांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी. दिला आहे.