न्यायाधीन बंद्यांमध्ये फ्रिस्टाइल पाच कैद्यांकडून एकाला मारहाण
जिल्हा कारागृहातील घटना.
सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
यवतमाळ जिल्हा कारागृहात
एका न्यायाधीन बंद्याला पाच कैद्यांनी संगणमत करून लाथा बुक्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी सकाळी ७:१५ वाजताच्या सुमारास घडली. यामुळे कारागृहात पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.दत्ता शंकर वानखडे असे मारहाणीत जखमी झालेल्या बंद्याचे नाव आहे. तर सुहास सुरेश वाकोडे, विशाल सुनील मंदीरकर, गणेश राजू केटले, रितीक गणेश तोडसाम, वृषभ गणेश वानखडे अशी मारहाण करणाऱ्या बंद्यांची नावे आहेत. येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये क्षमतेपेक्षा अधिक बंदी आहेत. त्यामुळे जिल्हा कारागृह अधिकारी कर्मचाऱ्यांना नियोजन करताना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यातच गेल्या वर्षांमध्ये तुरुंगातील तुरुंगातील कैद्यांमध्ये फ्रिस्टाईल ही नित्याची वाव झाली आहे. यापूर्वी गतवर्षी देखील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात प्रतिबंधित क्षेत्रात जाण्यापासून रोखल्याने न्यायाधीन बंद्याने एका शिपायासोबत वाद घातला होता. एवढेच नव्हे तर त्याच्या अन्य साथीदारांनी तुरुंग अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. याप्रकरणी अवधूतवाडी पोलिसात गुन्हा देखील दाखल झाला आहे. त्यानंतर आज बुधवारी सकाळच्या सुमारास पुन्हा जिल्हा मध्यवर्ती कारगृहात दत्ता वानखडे या बंद्यासोबत संबंधित कैद्यांनी संगणमत करून विनाकारण वाद उपस्थित केला. एवढेच नव्हे तर त्याला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हा प्रकार लक्षात येतात जिल्हा कारागृहातील कर्मचारी धावून आले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून वाद सोडविला. घटनेनंतर जिल्हा कारागृहाचे प्रभारी अधीक्षक एस. एस ठाकरे यांनी बंदिस्त कायद्यांवर गुणी दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर फिर्यादी कारागृह शिपाई किरण सोनवणे यांनी याप्रकरणी अवधूतवाडी पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. परंतु या प्रकारामुळे पुन्हा एकदा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे दिसत आहे.