बंद मध्ये सहभागी होण्यासाठी व्यापा-यांच्या घेतल्या भेटी —- शहरातील सर्व सामाजिक, शेतकरी संघटनांचा पुढाकार

प्रतिनिधी यवतमाळ:- दिनांक 8 डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेला भारत बंद यशस्वी करण्यासाठी आज विविध संघटनांच्या पदाधिका-यांनी शहरातील व्यापा-यांच्या भेटी घेऊन त्यांना बंद मध्ये उत्स्फुर्त सहभाग घेण्याची विनंती केली. विशेष म्हणजे व्यापा-यांनी सुध्दा या बंद मध्ये सहभाग नोंदविणार असल्याची ग्वाही दिल्याची माहिती शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी दिली आहे.

केन्द्र सरकारने पारीत केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात शहरातील सर्वच सामाजिक तसेच शेतकरी संघटना एकवटल्या आहे. दिनांक 8 डिसेंबर रोजी भारत बंद पुकारण्यात आला आहे. या बंद ला यवतमाळ जिल्हयातील सर्व सामाजिक, शेतकरी तसेच राजकीय पक्षांनी पाठिंबा घोषीत केला आहे. शहर तसेच जिल्हयातील सर्व प्रतिष्ठाने बंद मध्ये सहभागी व्हावे म्हणून शहरातील सर्व संघटनांनी आज व्यापा-यांच्या भेटी घेतल्या. त्यांना बंद मध्ये सहभागी होण्याबाबत तसेच या कायद्याचे समाजावर कसे विपरीत परीणाम होतील याबाबत माहिती दिली. केन्द्र सरकारने काळे कृषी कायदे आनले आहे. या कायद्यामुंळे शेतकरीच नव्हे तर सर्वसामान्य जनता सुध्दा भरडल्या जाणार आहे. हे सरकार इंग्रजांपेक्षाही जुलमी कायदे आनत आहे. या अन्यायाविरोधात वेळीच जागे न झाल्यास त्याचे गंभीर परीणाम भोगावे लागतील असे विविध सामाजिक तसेच शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी देवानंद पवार, डॉ. दिलीप महाले, अशोक भुतडा, ज्ञानेश्वर गोरे, आनंद गायकवाड, चंदु चौधरी, सतीश काळे, जयसिंग चौहाण, उमेश इंगळे, अरुण ठाकूर, सृष्टी दिवटे, प्रदीप डंभारे  यांनी व्यापा-यांना आज समजावून सांगीतले.

बसस्थानक चौकातून विनंती फेरी

कृषी कायद-यांच्या विरोधात बंद यशस्वी व्हावा म्हणून सर्व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सकाळी बसस्थानक चौकात एकत्रित येणार आहे. येथून संपुर्ण शहरात फिरुन व्यापा-यांना बंद मध्ये सहभागी करण्यासाठी विनंती फेरीची सुरुवात होणार आहे. या बंद मध्ये सर्व व्यावसाईकांनी तसेच नागरीकांनी सहभागी होण्याचे आवाहन देवानंद पवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed