मणीबाई भांडारकर यांचे वृद्धपकाळाने निधन

यवतमाळ:- स्थानिक जय विजय चौक परिसरात राहणाऱ्या ज्येष्ठ परिचारिका रेखा उर्फ माई रणदिवे यांच्या मातोश्री श्रीमती मणीबाई पांडुरंग भांडारकर यांचे सोमवारच्या सायंकाळी वृद्धपकाळाने निधन झाले.मृत्यूसमयी त्या ९२ वर्षाच्या होत्या.आज दुपारी १२ वाजता ख्रिस्ती स्मशानभूमीत ख्रिस्ती परंपरेनुसार त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात २ मुली,जावई, नात सौ. प्रिया,हरिष यासह मोठा परिवार आहे.अंत्यसंस्कार करतेवेळी पास्टर जितेंद्र सहारे यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या.