परवानगी न मिळाल्याने शेतक-यांचा जागर सत्याग्रह रद्द —– काळया कायद्याच्या विरोधातील लढाई सुरुच ठेऊ- सिकंदर शहा

परवानगी न मिळाल्याने शेतक-यांचा जागर सत्याग्रह रद्द
काळया कायद्याच्या विरोधातील लढाई सुरुच ठेऊ- सिकंदर शहा
प्रतिनिधी यवतमाळ:- एकाच ठिकाणी जवळपास 5 हजार शेतकरी जागर परीषदेला जमनार असल्याने कोरोना संसर्गाचा धोका होता. त्यामुळे परवानगीस अडचण निर्माण झाल्याने तसेच शेतक-यांच्या आरोग्याचा विचार करुन विविध शेतकरी संघटनांनी घोषीत केलेला जागर सत्याग्रह रद्द करण्यात आल्याची माहिती शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शहा यांनी दिली आहे.
केन्द्र सरकारने कृषी क्षेत्राशी संबंधीत तीन कायदे संसदेत पारीत केले आहे. या नविन कायद्याविरोधात देशभर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. हे कायदे व्यापारी धार्जीने असून शेतक-यांची प्रचंड लुट करणारे आहे. त्यामुळे विविध शेतकरी संघटनेच्या वतीने वर्धा जिल्हयातील सेवाग्राम येथे दिनांक 12 डिसेंबर ते 15 डिसेंबर पर्यन्त शेतकरी जागल सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले होते. या सत्याग्रहात सामाजिक तसेच शेतकरी संघटनांचे नेते मार्गदर्शन करणार होते. संपुर्ण विदर्भातून जवळपास पाच हजार शेतकरी या जागर सत्याग्रहास उपस्थित राहतील अशी व्यवस्था करण्यात आली होती. मात्र कोरोना संसर्गाचा धोका असल्यामुळे प्रशासनाने सिमित शेतक-यांच्या उपस्थितीची अट समोर ठेवली. अखेर शेतक-यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी तुर्तास हा सत्याग्रह रद्द करण्यात येत असल्याचे घोषीत केले आहे. केन्द्र सरकारने पारीत केलेले तीनही कृषी कायदे शेतक-यांना गुलामगीरीत ढकलणारे आहे. पंजाब, हरीयानात तर मोठमोठया गोदामांची निर्मिती सुध्दा सुरु करण्यात आली आहे. या कायद्यामुळे शेतकरी वर्ग भयग्रस्त झाला असल्याने हे तीनही कायदे परत घेण्याची मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.
लढाई सुरुच ठेवणार
केन्द्र सरकारने पारीत केलेले कायदे शेतीचे व्यापारीकरण करणारे आहे. यामुळे शेतमालाची आधारभूत किंमत संपुष्टात येण्याची भीती आहे. देशातील 60 टक्के जनता शेतीवर अवलंबून असल्यामुळे निदान शेतमालाला तरी किमान आधारभूत किंमत कायम ठेवणे गरजेचे आहे. देशभर आंदोलन सुरु असतांनाही सरकार काहीच एैकायला तयार नाही. त्यामुळे आम्हीसुध्दा आता आरपार ची लढाई लढण्यास तयार आहो.