नगरपरिषदेचा राजकारणात यवतमाळकर वाऱ्यावर
लोकप्रतिनिधींचे ही प्रभागात दुर्लक्ष
प्रत्येक प्रभागात कचऱ्याची समस्या
गुरुदेव युवा संघ करणार रस्त्यावर उतरून आंदोलन
यवतमाळ प्रतिनिधी:- यवतमाळ नगर परिषद कोणत्या ना कोणत्या प्रकरणात चर्चेत असते मात्र नगरपरिषदेच्या मनमानी कारभारामुळे आता यवतमाळ करांचा संयम फुटण्याची वेळ आली आहे यवतमाळ नगरपरिषद हद्दीत घंटागाडी फिरत नसून अनेक प्रभागात कचऱ्याचे ढिगारे तयार झाले आहे घंटागाडी चालक मनमानी करीत आहे अनेक प्रभागात विकास कामे कागदावरच दिसत आहे अनेक प्रभागात रस्ते नाही नाल्याचा पत्ता नाही डुकरांचा हैदोस याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी सोबतच नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केला आहे
यवतमाळ नगरपरिषदेची हद्द वाढ झाल्यापासून नगरपरिषद नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे नगरपरिषदे द्वारे शहरातील कचरा संकलन करण्यासाठी कचरा संकलनाचे कंत्राट देण्यात आले मात्र कंत्राट संपून सुद्धा जुन्या कंत्राटदाराला मुदतवाढ नगरपरिषद दिली आहे त्यामुळे कंत्राटदाराची मनमानी सुरू आहे मात्र शहरात कुठे घंटागाडी कचरा संकलन करताना दिसून येत नाही त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे झाले आहे
यवतमाळ शहरात अनेक कंत्राटदार असून यवतमाळ नगरपरिषदेने थोडासा आर्थिक लोबा पोटी मराठवाड्यातील कंत्राटदाराला कचरा संकलनाचे कंत्राट दिले कंत्राटदाराचे संपूर्ण कामकाज शहरातील एक एक दारू व्यवसायिक बघत आहे काही दिवसातच कचरा संकलन कंत्राटाच्या भरोशावर या दारू व्यवसायिकांने खूप मोठी माया गोळा केली आहे नगरपरिषदेच्या काही अधिकाऱ्यांनी सुद्धा यात हातोले केल्याचा आरोप गुरुदेव संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केला