नानाभाऊ पटोले यांच्या प्रदेशाध्यक्षपद निवडीचा यवतमाळ येथे जल्लोष

शिवाजीराव मोघे कार्याध्यक्ष ; विदर्भात दोन पदे मिळाल्याने काँग्रेसमध्ये चैतन्य

यवतमाळ : नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीमध्ये विदर्भाच्या वाट्याला दोन पदे आल्याने यवतमाळ जिल्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोषात या निवडीचे स्वागत केले. माजी विधानसभाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने महाराष्ट्र काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. तसेच माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांची प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
यवतमाळ येथील दत्त चौकात अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला.

शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव संघर्ष करणाऱ्या लढवय्या नेत्याला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेमणूक करून शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला आहे अशी भावना यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
प्रचंड घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी नानाभाऊ पटोले यांच्या निवडीबाबत कार्यकर्त्यांमध्ये असलेला उत्साह प्रदर्शित केला. काँग्रेसचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत नेण्यासाठी नानाभाऊ मार्गदर्शक थरातील असा विश्वास यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चंद्रशेखर चौधरी, शहर उपाध्यक्ष जावेद अन्सारी, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनमोहन भोयर, किसान काँग्रेस शहराध्यक्ष उमेश इंगळे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अतुल राऊत, उत्तर भारतीय आघाडीचे अध्यक्ष अरुण ठाकूर, यवतमाळ विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष विक्की राऊत, शब्बीर खान, प्रवीण सवाई, कैलास सुलभेवार, विशाल पावडे, प्रदीप डंभारे, बबली भाई, घनश्याम अत्रे, ललित जैन, जितेश नवाडे, मीनाक्षी सवळकर, पल्लवी रामटेके, अन्सारीजी, वैशाली सवाई, इंगोले ताई यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed